लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये हफ्ता झाला जमा लगेच करा तुमच्या खात्याचे बॅलन्स चेक

नमस्कार मित्रांनो लाडक्या बहि‍णींना आत्तापर्यंत जुलै ते डिसेंबर असे ९ हजार रुपये मिळालेले आहेत.आता जानेवारीचा हप्ता कधी येणार, याबाबत चर्चा सुरु होती.याच चर्चेबाबत आज महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली.काय म्हणाल्या तटकरे?जानेवारीच्या हप्त्याबाबत आज मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाचे ट्विट केले.

हे सुद्धा बघा : आधारकार्ड वर मिळणार आता कोणत्याही हमीशिवाय 50 हजार रुपये पर्यंत कर्ज असा करावा लागणार अर्ज

त्या ट्विटमध्ये तटकरे म्हणाल्या की, जानेवारीचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.२४ जानेवारीपर्यंत १.१० कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. २६ जानेवारीपर्यंत पात्र सर्व महिलांच्या खात्यात त्यांचे पैसे जमा झालेले असतील.या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात कालपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांनी या योजनेतून स्वतः माघार घेतली, त्या महिला वगळता इतर सर्व महिलांना या योजनेतून पैसे मिळणार आहेत.

हे सुद्धा बघा : आधारकार्ड वर मिळणार आता कोणत्याही हमीशिवाय 50 हजार रुपये पर्यंत कर्ज असा करावा लागणार अर्ज

आत्तापर्यंत सुमारे सव्वा कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले महायुती सरकारने २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले असले तरी, जानेवारीचा हप्ता हा १५०० रुपयांप्रमाणेच जमा झाला आहे.येत्या अर्थसंकल्पात वाढीव सन्मान निधीबाबत चर्चा होऊन त्यानंतर २१०० रुपये मिळतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जानेवारीचे पैसे मिळून आत्तापर्यंत महिलांना साडेदहा हजार रुपये या योजनेतून मिळाले आहेत.या योजनेचे पैसे बॅकेच्या खात्यात जमा होण्यास कालपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी १.१० कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. आता आज व उद्या मिळून येत्या दोन दिवसांत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे महिला व बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

लोकप्रिय योजना

Leave a Comment