विद्यार्थ्यांसाठी खुशखबर.! विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्षाला 6 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात असा करा अर्ज
|

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर.! विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्षाला 6 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो भारतीय पोस्ट विभागाकडून इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी दीनदयाल स्पर्श योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना दरमहा ५०० प्रमाणे वर्षाला ६ हजार रुपये मिळणार आहेत याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पोस्ट विभागाच्या स्टॅम्पचा संग्रह करून कॅटलाॅग करावा लागणार आहे.

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणीसाठी मोठी माहिती.! या लाडक्या बहिणींना जानेवारी मिळणार नाही 1500 रुपये यादी तपासा

जुने स्टॅम्प शोधून त्यांचे जतन करून प्रदर्शन करणे, त्यावर अधिक संशोधन करणे, असे विविध छंद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांची या योजनेसाठी निवड होणार आहे.विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे, तसेच छंद म्हणून टपाल तिकिटांचा संग्रह आणि त्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात येते.

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणीसाठी मोठी माहिती.! या लाडक्या बहिणींना जानेवारी मिळणार नाही 1500 रुपये यादी तपासा

दरवर्षी भारतातील ९२० विद्यार्थ्यांची या योजनेसाठी एक वर्षासाठी निवड होते. प्रत्येक पोस्टल सर्कल इयत्ता सहावी ते नववीपर्यंतच्या प्रत्येकी १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते. त्याची रक्कम दर तीन महिन्यांनी वितरित केली जाते. यापूर्वी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षीही अर्ज करता येतो. शाळेमध्ये फिलाटली क्लब नसल्यास विद्यार्थ्यांचे स्वतःचे फिलाटली डिपॉझिट खाते विचारात घेतले जाते.पोस्ट ऑफिसमध्ये शैक्षणिक प्रमाणपत्र, वयाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड प्रत अर्जासह जोडावी. फिलाटली डिपॉझिट खात्यातील सदस्यत्वाचा तपशील आवश्यक आहे. भरलेला अर्ज पोस्ट ऑफिसच्या वरिष्ठ अधीक्षकांकडे जमा करावा. सोबत पोस्ट स्टॅम्पचा तयार केलेला प्रोजेक्ट जोडावा लागणार आहे.शिष्यवृत्तीसाठी किमान ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून परीक्षा पास झालेला विद्यार्थी योजनेसाठी पात्र आहेत. एससी, एसटी श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी किमान ५५ टक्के गुण असणे बंधनकारक आहे

लोकप्रिय योजना

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *