लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! लाडक्या बहिणींना अनुदानावरती सरकार वाटत आहे पिंक रिक्षा लगेच करा अर्ज
नमस्कार मित्रांनो महिला व बालविकास विभागातर्फे शहर आणि ग्रामीण भागातील गरजू महिलांना अनुदानावर पिंक ई-रिक्षा देण्यात येणार आहे. या योजनेत राज्य शासनाकडून २० टक्के अनुदान मिळणार आहे तसेच ६०० महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसाहाय्य करण्यात येणार आहेयासाठी इच्छुक महिलांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

येथे क्लिक करुन बघा अर्ज कसा करायचा
पिंक ई-रिक्षा योजनेतून महिला व मुलींच्या रोजगारनिर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, स्त्री सशक्तीकरणास चालना देणे, महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करण्यासाठी नोकरी, तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसाहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ई-रिक्षा उपलब्ध करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून महिलांना परवाना, परमिट, बॅच बिल्ला, प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.योजनेत ई-रिक्षाच्या किमतीमध्ये जीएसटी, रजिस्ट्रेशन, रोड टॅक्स आदी करांचा समावेश राहणार आहे. नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, अनुज्ञेय असलेल्या खासगी बँकांकडून ई-रिक्षा किमतीच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.राज्य शासन २० टक्के आर्थिक भार उचलेल, योजनेची लाभार्थी महिला मुली यांना १० टक्के स्वहिस्सा भरावा लागणार आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी पाच वर्षे मुदत राहणार आहे.
येथे क्लिक करुन बघा अर्ज कसा करायचा
लोकप्रिय योजना
- Where to Sell My Home in the USA: A Comprehensive Guide
- How to Take a Home Loan in the USA
- Which 5 Car Insurance Companies Are the Best?
- Where Should I Complete My Graduation in the USA?
- Best Personal Injury Lawyers in the USA: A Comprehensive Guide to Legal Excellence
- 5 Best Colleges in the USA for an MBA: A Comprehensive Guide
- 5 Best Colleges in the USA for an MBA: A Comprehensive Guide 2025
- Where to Sell My Home in the USA: A Comprehensive Guide 2025
- How to Take a Home Loan in the USA 2025
- Which 5 Car Insurance Companies Are the Best? 2025
- Where Should I Complete My Graduation in the USA? 2025
- Best Personal Injury Lawyers in the USA: A Comprehensive Guide to Legal Excellence 2025