लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पाच हप्त्याचे आतापर्यंत ७५०० रुपये जमा झाले आहेत.

आता डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याच्या पैशांची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. पण या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हफ्ता एकत्र मिळणार आहेत. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी आर्जदारांचा आकडा २ कोटी ४७ लाखांपर्यंत आहे.या योजनअंतर्गत राज्यातील कोट्यवधी महिलांना गेल्या 5 महिन्यात 7500 रुपये तर मिळाले पण चार महिने झाले तरी अंगणवाडी सेविकांना एकही अर्ज भरून घेतल्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. सरकारकडून त्यांना पैसे देण्यात आलेला नाही.

लोकप्रिय योजना