आधारकार्ड अपडेट (Aadhar Card Update) करण्यासाठी सर्वात आधी ‘MyAadhaar’ च्या https://uidai.gov.in/en/ ‘या पोर्टलवर जाऊन लॉगिन करा. त्यानंतर आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा. यानंतर तिथे विचारण्यात आलेले उपयुक्त कागदपत्रे अपलोड करा. आपली ओळख आणि नव्या कागदपत्रांसाठी आवश्यक दस्तावेज अपलोड करा. ही अपडेशन सेवा मोफत आहे. या सेवेचा फायदा घेऊन लवकरात लवकर तुमचे आधारकार्ड अपडेट करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
